गुरुवार, 4 अगस्त 2011

सदाचार


स्वप्नात मला  माझ्या
उंटच नेहमी दिसायचा
निधड्या छातीचा सिंह
दुर्मिळ कधीतरी असायचा

वाटलं आपल जीवन
नेहमी वाळवंटातच  जाणार
जंगलाचा राजा होण्याचं
स्वप्न तसंच राहणार

डरकाळ्या फोडण लांबच
जीवन पालवीला असुसणार
काटेरी झुडपं खाऊन
मृगजळाच्या मागे धावणार

ओझे वाहत नेऊन
जीवाचा होईल आकांत
हिरवगार जंगल ते
कधी करणार पादाक्रांत

अजबच झालं एकदा
स्वप्नात आले ते दोघे
म्हणे मला अरे वेड्या
शहाणपणाचा सल्ला घे

सिंह दिसतो जरी राजा
तरी त्याला शत्रू फार
कधी एखाद्या सापळयाने
करेल शिकारी त्याला ठार
वाळवंटातल्या उंटाची सर
कोणाला कधी न येणार
तो नसेल सोबत तर
वादळाची सूचना कोण देणार

जीवनाच्या प्रवासात तू
दुर्बलांचे जीव घेशील ?
का उराशी माया ठेवून
वाळवंट तरवून नेशील ?


कठीण नव्हतं उत्तर
प्रश्नाचं विचारलेल्या मला
एकाकी हिंस्र सिंहापेक्षा
सदुपयोगी उंटच भला.

मंगलवार, 26 जुलाई 2011

अन कुठाय कविता ?

सरळ हाय त्या रस्त्यावरण
नाकासारशी चालत रहायचं
लागलाच एखांद वळण तर
इच्यार ना करता वळायचं
शब्दायायचा ख्योळ करायचं
काम हाय ते सावित्तीकाचं
आमच्या सारख्या अडाण्याला
त्यातलं कायबी नाय कळायचं

मार्ल्याय पाचर कुनीतर म्हणून
यमक कसातरी जुळवून घ्यायाचं
याकारणाचा करायचा बट्ट्याबोळ
कुकडबी आपलंच घोड उधळायचं
कांदा भाकरी घोंगड न काठी
हेच आपलं कुठबी लिव्हायचं
अन आमच्यासारख्या अडाण्याला
त्यातलं कायबी नाय कळायचं .

फावला विचार

 देव्हाऱ्यातील इवलासा दिवा,
प्रकाश पसरवत जळतो
तो करतो त्याच काम
पण त्याचा हेतू का कोणाला कळतो ?

सुगंध पसरवत सर्वत्र
स्वतःला चंदन उगाळावून घेतो
होतो त्याचा जन्म सार्थक
त्याच्या आहुतीला का कोणी मान देतो ?

ऋतू ऋतूत फुले उमलावूनी
वेळी अलगद फुलवितात बहार
फुले तोडून मैफिल सजविताना
कोणी करतो त्यांच्या नात्याचा विचार ?

न चुकता उगवूनी रोज
देतो सूर्य सोनेरी प्रकाश
दिसतो दाह त्यातला सर्वांना
त्याचा त्याग पाहण्यास आहे कोणाला अवकाश ?

हि आहे आपुलकी
हा आहे जिव्हाळा
हा आहे सारा भावनांचा खेळ
धर्मावरून गळे धरताना एकमेकांचे
निसर्ग कडून प्रेम शिकण्यास
आहे का कोणाकडे वेळ ?