सरळ हाय त्या रस्त्यावरण
नाकासारशी चालत रहायचं
लागलाच एखांद वळण तर
नाकासारशी चालत रहायचं
लागलाच एखांद वळण तर
इच्यार ना करता वळायचं
शब्दायायचा ख्योळ करायचं
काम हाय ते सावित्तीकाचं
आमच्या सारख्या अडाण्याला
त्यातलं कायबी नाय कळायचं
मार्ल्याय पाचर कुनीतर म्हणून
यमक कसातरी जुळवून घ्यायाचं
याकारणाचा करायचा बट्ट्याबोळ
कुकडबी आपलंच घोड उधळायचं
कांदा भाकरी घोंगड न काठी
हेच आपलं कुठबी लिव्हायचं
अन आमच्यासारख्या अडाण्याला
त्यातलं कायबी नाय कळायचं .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें