देव्हाऱ्यातील इवलासा दिवा,
प्रकाश पसरवत जळतो
तो करतो त्याच काम
पण त्याचा हेतू का कोणाला कळतो ?
सुगंध पसरवत सर्वत्र
त्याच्या आहुतीला का कोणी मान देतो ?
प्रकाश पसरवत जळतो
तो करतो त्याच काम
पण त्याचा हेतू का कोणाला कळतो ?
सुगंध पसरवत सर्वत्र
स्वतःला चंदन उगाळावून घेतो
होतो त्याचा जन्म सार्थकत्याच्या आहुतीला का कोणी मान देतो ?
ऋतू ऋतूत फुले उमलावूनी
वेळी अलगद फुलवितात बहार
फुले तोडून मैफिल सजविताना
कोणी करतो त्यांच्या नात्याचा विचार ?
न चुकता उगवूनी रोज
देतो सूर्य सोनेरी प्रकाश
दिसतो दाह त्यातला सर्वांना
त्याचा त्याग पाहण्यास आहे कोणाला अवकाश ?
हि आहे आपुलकी
हा आहे जिव्हाळा
हा आहे सारा भावनांचा खेळ
धर्मावरून गळे धरताना एकमेकांचे
निसर्ग कडून प्रेम शिकण्यास
आहे का कोणाकडे वेळ ?
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें