मंगलवार, 26 जुलाई 2011

अन कुठाय कविता ?

सरळ हाय त्या रस्त्यावरण
नाकासारशी चालत रहायचं
लागलाच एखांद वळण तर
इच्यार ना करता वळायचं
शब्दायायचा ख्योळ करायचं
काम हाय ते सावित्तीकाचं
आमच्या सारख्या अडाण्याला
त्यातलं कायबी नाय कळायचं

मार्ल्याय पाचर कुनीतर म्हणून
यमक कसातरी जुळवून घ्यायाचं
याकारणाचा करायचा बट्ट्याबोळ
कुकडबी आपलंच घोड उधळायचं
कांदा भाकरी घोंगड न काठी
हेच आपलं कुठबी लिव्हायचं
अन आमच्यासारख्या अडाण्याला
त्यातलं कायबी नाय कळायचं .

फावला विचार

 देव्हाऱ्यातील इवलासा दिवा,
प्रकाश पसरवत जळतो
तो करतो त्याच काम
पण त्याचा हेतू का कोणाला कळतो ?

सुगंध पसरवत सर्वत्र
स्वतःला चंदन उगाळावून घेतो
होतो त्याचा जन्म सार्थक
त्याच्या आहुतीला का कोणी मान देतो ?

ऋतू ऋतूत फुले उमलावूनी
वेळी अलगद फुलवितात बहार
फुले तोडून मैफिल सजविताना
कोणी करतो त्यांच्या नात्याचा विचार ?

न चुकता उगवूनी रोज
देतो सूर्य सोनेरी प्रकाश
दिसतो दाह त्यातला सर्वांना
त्याचा त्याग पाहण्यास आहे कोणाला अवकाश ?

हि आहे आपुलकी
हा आहे जिव्हाळा
हा आहे सारा भावनांचा खेळ
धर्मावरून गळे धरताना एकमेकांचे
निसर्ग कडून प्रेम शिकण्यास
आहे का कोणाकडे वेळ ?